Thane Lift Accident : रुणवाल आयरीन इमारतीची लिफ्ट कोसळली, मृतांचा आकडा सातवर : ABP Majha
ठाण्यातील लिफ्ट अपघातात मृतांचा आकडा सातवर गेला आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर सुनील कुमार दास या कामगारावर निपुण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ठाण्यातील बाळकुम परिसरात रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे. रविवारी संध्याकाळी इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचं काम सुरू होतं. ते काम संपवून कामगार लिफ्टनं खाली येत होते. तेव्हा लिफ्टचा दोर तुटल्यानं भीषण अपघात झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.