Thane - Kalwa Khadi Bridge : तिसरा कळवा खाडी पूल कधी पूर्ण होणार?, एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
ठाण्यातील कळवा नाका आणि साकेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे पालिकेने तिसरा कळवा खाडी पूल बांधण्यास सुरुवात केली. २०१४ पासून या पुलाची फक्त एकच मार्गिका बांधून तयार झालीय. मात्र ही मार्गिका अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. या मार्गिकेवरून एबीपी माझाने प्रवास करून सत्य परिस्थिती जाणून घेतली. मात्र अजूनही काम अपुरे असल्याचा बहाणा देत ठाणे पालिकेने या मार्गिकेचे उद्घाटन केले नाही असा आरोप होतोय.. या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पालिका कुणाची वाट पाहतेय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.