Thane Fire : सिनेवंडर मॉलजवळ लागली भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु
Thane Fire: ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील (Cine Wonder Mall) इमारतीला भीषण आग लागली आहे. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.