Thane EVM Problem : ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा
ठाण्यातील दिव्यांग कला केंद्र, जिजामाता उद्यान या मतदान केंद्रावर मशीन बंद आहे, त्यामुळे अनेक मतदार परत गेलेत..
राज्यात आज पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान
राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
मतदान करा, आरोग्य तपासणी मोफत करून घ्या, देव देश प्रतिष्ठानचा उपक्रम
मतदान हे कर्तव्य असले तरी देशात मतदानाचा टक्का घसरताना दिसत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संघटना याबाबत जनजागृती करताना दिसत आहे. मुंबईसह देशभरात आरोग्य क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या देव देश प्रतिष्ठान ने मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जो मतदार मतदान करेल त्यांना देव देश प्रतिष्ठानशी संलग्न असलेल्या घाटकोपर, ठाणे, बदलापूर येथील क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार मिळणार आहे. दि २६ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हे तपासणी शिबिर असणार आहे. डॉ. विनायक अवकीरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.वैभव देवगिरकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचा आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.