Thane Bhiwandi Bypass : ठाण्यातील साकेत पुलाच्या दुरुस्तीमुळे मुंबई-नाशक महामार्गावर वाहतूक कोंडी
ठाण्यातील साकेत पुलाच्या दुरुस्तीमुळे मुंबई-नाशक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. या ठिकाणी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्यात. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणेकर आणि मुंबईकरांना बसतोय. हा पूल मनसे कार्यकर्त्यांनी धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. त्यानंतर पुलाच्या एक्सपान्शन जॉईंट मधील बेअरिंग तुटल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढलंय. आता या पुलाचं काम सुरू झालं असून काम पूर्ण होण्यास ६ ते ७ दिवस लागतील. त्यासाठी पुलावरील नाशिकच्या दिशेची एक मार्गिका बंद ठेवण्यात आलीय.