Thane Bandh on Maratha Protest : जालन्यातील लाठीमाराविरोधात सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक

Continues below advertisement

सकल मराठा समाजानं आज ठाणे बंदची हाक दिली आहे. जालन्यात झालेल्या लाठीमाराविरोधात आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बंदला भाजपनं देखील पाठिंबा दिला आहे. तसंच, महाविकास आघाडी आणि मनसेनं देखील बंदचं समर्थन केलं आहे. ठाण्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात देखील व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात एकूण २ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या आजचा ठाणे दौरा रद्द केला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram