Thackeray vs Shinde : Thane Kalyan Bhiwandi त कोण मारणार बाजी? शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय...
अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या तोफा आपापल्या उमेदवारांसाठी धडाडल्या...
सोमवारी महाराष्ट्रातल्या १३ जागांवर मतदान होणार आहे...
तिकडे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. ठाणे आणि कल्याणच्या जागेवर कोण बाजी मारणार? मतदार कुणाला साथ देणार याची उत्सुकता लागून राहिलीय..
भिवंडी आणि पालघरच्या जागेवर तिरंगी लढत होतेय.. तिरंगी लढतीत मतदार कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहावं लागणार आहे..
ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांचे मतदारांना आवाहन.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे 20 मे रोजी मतदान असणार आहे ठाणे, कल्याण, भिवंडी मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवश्यक रित्या मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांनी केले आहे.दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघ व कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे पोलीस आयुक्तालय द्वारा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रॅपिड फोर्स, ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स, दंगल विरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरात तैनात करण्यात आले आहेत...