Thane Skywalk : कळवा-विटावा ते ठाणे स्टेशन कोळीवाड्यापर्यंत आता स्कायवॉक तयार
ठाणे रेल्वे स्थानकावर येण्यासाठी कळवा आणि विटावाकरांना रिक्षा किंवा रेल्वे रुळांवरून चालण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वे रुळांचा प्रवास तर जीव धोक्यात टाकून करावा लागत होता. पण आता यातून कळवा आणि विटावारांची सुटका होणार आहे. कळवा-विटावा ते ठाणे स्टेशन कोळीवाड्यापर्यंत आता स्कायवॉक तयार करण्यात आलाय. या स्कायवॉकमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.