Shrikant Shinde : कल्याण - डोंबिवली आणि ठाण्यात बहुमताने विजय होणार - श्रीकांत शिंदे
Shrikant Shinde : कल्याण - डोंबिवली आणि ठाण्यात बहुमताने विजय होणार - श्रीकांत शिंदे महायुतीकडून ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याच्या जागेवरून अनेक दिवस खलबतं सुरू होती. विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपची इच्छा होती. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकही इच्छुक असल्याची चर्चा होती. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे ती जागा सोडण्यास शिंदे गट अजिबात तयार नव्हता असं कळतंय. अखेर दोन्ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या, आणि आज सकाळी उमेदवार जाहीर करण्यात आले.