Thane Shops Reopen | ठाण्यात सम-विषम फॉर्म्युल्यानुसार दुकानं सुरू करण्यास परवानगी, हळूहळू अनलॉकला सुरुवात
कोविड 19 चे संकट अदयापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. 15 ऑगस्टनंतर शहरातील P1 व P2 नुसार ज्या आस्थापना सुरू होत्या त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्रौ 7.00 पर्यंत सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केटस्, जीम व स्वीमिंग पूल बाबत आढावा घेवून त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाल दिल्या आहेत. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाईम स्लॉट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.