Thane Shivsena v/s BJP: ठाण्यात शिवसेना- भाजप आमनेसामने, भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या घोषणा
ठाण्यात आज ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आले होते. उद्धव ठाकरे गटाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारविरोधात स्वाक्षरी मोहिम सुरु केली होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजप पदाधिकाऱ्यांनी सारंग मेढेकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या दोन्ही आयोजकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी आपापला कार्यक्रम आयोजित केल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना आवरले.
Tags :
Narendra Modi Prime Minister Gujarat Birthday BJP : Uddhav Thackeray Thackeray Group Kedar Dighe Foxconn Company Face To Face District President Against Shinde Government Signature Campaign