Kalyan Shivsena v/s BJP : कल्याणमध्ये शिवसेना-भाजप युतीतील वाद विकोपाला

कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधला वाद आता विकोपाला गेलाय.. व्हाट्सअपच्या एका ग्रुपवर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात हमरी तुमरी झाली.. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही एकमेकांना जनतेसमोर येण्याचं आवाहन केलं. दोघे कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात जमणार होते. त्यानंतर भाजपा आमदार कार्यकर्त्यांसह पोहोचले. तर शिवसेना शहरप्रमुखाला पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेतलं. शिवसेना शहरप्रमुख आणि भाजप आमदारांमधील वाद थांबवण्याचा आवाहन आता  वरिष्ठ नेत्यांसमोर उभं ठाकलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola