Roshani Shinde Case : रोशनी शिंदे हल्ला प्रकरणानंतर ठाण्यात वातावरण तापलं, शिंदे गटही आक्रमक
Roshani Shinde Case : रोशनी शिंदे हल्ला प्रकरणानंतर ठाण्यात वातावरण तापलं, शिंदे गटही आक्रमक
Uddhav Thackeray : एक फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती 'फडणवीसी' करत आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सोमवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रोशनी शिंदे यांची आज रुग्णालयात ठाकरे कुटुंबीयांनी भेट घेतली.
रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने रोशनी शिंदे प्रकरणी चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला. उद्धव यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायलयाने सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते. त्याची प्रचिती ठाण्यात आली. एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. इतकंच काय या पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे उद्धव यांनी म्हटले.