Raj Thackeray Thane :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन, त्यांच्या गणपतीबाप्पांचं दर्शन घेतलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांचा हा ठाणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात त्यांनी ठाण्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधल्या गणपतीबाप्पांचं दर्शन घेतलं. त्यांच्या दौऱ्यासाठी ठाणे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरात आणि मनसैनिकांच्या गर्दीत स्वागत करण्यात आलं. दरम्यान, आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे यांना गुडघ्याच्या दुखापतीमुळं ठाणे दौरा आवरता घेऊन घरी परतावं लागलं आहे. या दौऱ्यात एका ठिकाणी गाडीतून उतरताना गाडीचा रॉड राज ठाकरेंच्या गुडघ्याला लागला. त्यामुळं त्यांचा गुडघा दुखावला. त्यानंतर राज ठाकरे काही वेळ ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते घरी परतले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola