Pune Thane water logging : पावसामुळे पुणे,ठाणे पाण्यात ,मुंबई मात्र तोऱ्यात : ABP Majha
मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पावसाची.. पावसाळा सुरू झाला की नेहमीच मुंबईची तुंबई झाली असा सूर लावणाऱ्या मुंबईकरांसाठी यंदाचा पावसाळा काहीसा सुखद ठरलाय. आज मुंबई, ठाणे आणि पुण्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठाणे आणि पुण्यात जागोजागी पाणी साचलंय. रस्ते पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहतायत, पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पण यंदा मुंबईकरांचा पावसामुळे खोळंबा झालेला नाही. मुंबईतील सखल भागातदेखील पाण्याचा योग्य निचरा झाल्यामुळे पाणी तुंबलेलं नाही. हिंदमाता, सायन, लालबाग अशा नेहमीच पाणी साचणाऱ्य़ा भागात यंदा पाणी साचलं नाही. त्यामुळे मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याचं श्रेय देत.. पुणे- ठाणे पाण्यात आणि मुंबई तोऱ्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये..