Jitendra Awhad Cake Cutting : वाढदिवसाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला डिवचले..

मुंब्रा मधील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा मधील गद्दार फॅमिली गेल्याने मला काहीही फरक पडत नसल्याचे म्हंटले होते.आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस च्या मुंब्रा येथील स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो केक कापण्यात आला त्यावर गद्दार फॅमिली ,50 खोके एकदम ओके.खोके बोके..माजलेत बोके अशा आशयाचे मेसेज लिहिलेले होते.विशेष म्हणजे  वाढदिवस जरी कार्यकर्त्याचा असला तरी केक मात्र आव्हाडांनी कापला आणि त्यातच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही वाढदिवस असल्याने 
 यातून ते नक्की कोणावर निशाणा साधतायत याबद्दल ठाण्यात चर्चा होताना दिसत्ये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola