Anand Dighe Jayanti : आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त दिघेंची खोली आता पूर्ववत
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटानं दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचं नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलं. पण त्याआधीपासूनच ठाणेकरांच्या मनात आनंद दिघेंना आदराचं स्थान आहे. त्याच आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ठाण्याच्या टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम आम्ही आपल्याला दाखवत आहोत. मूळ आनंद आश्रमाचं पुनर्निमाण करून, दिघेसाहेबांची खोली आता पूर्ववत करण्यात आली आहे.