Naresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत
Naresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय...
अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या तोफा आपापल्या उमेदवारांसाठी धडाडल्या...
सोमवारी महाराष्ट्रातल्या १३ जागांवर मतदान होणार आहे...
तिकडे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. ठाणे आणि कल्याणच्या जागेवर कोण बाजी मारणार? मतदार कुणाला साथ देणार याची उत्सुकता लागून राहिलीय..
भिवंडी आणि पालघरच्या जागेवर तिरंगी लढत होतेय.. तिरंगी लढतीत मतदार कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहावं लागणार आहे..
दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात चुरस आहे..
दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांची लढत आहे..
उत्तर पश्चिम मुंबईत शिंदेंच्या रविंद्र वायकर यांच्याविरोधात ठाकरेंचे अमोल कीर्तिकर रिंगणात आहेत..