MNS Protest on Thane Hospital : ठाणे आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेचं ठिय्या आंदोलन
ठाण्यात शनिवारी रात्री महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचा जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव कार्यकर्त्यांसोबत आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं. तसंच आयुक्तांनी ठाणेकरांची माफी मागावी अशी देखील मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केलीय.