Thane Road : ठाणे-पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय, मुंबईहून नाशिकला जाणं सुकर
कल्याण आणि डोंबिवलीकर, आणि मुंबईहून नाशिकला जाणाऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे ते पडघ्यादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय MMRDAनं घेतला आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, शहापूरला जाणं अतिशय सुकर होणार आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत माणकोली-भिवंडी पट्ट्यात शेकडो गोदामं आणि वेअरहाऊस उभी राहिली. त्यामुळे अवजड वाहनांची संख्या कैक पटीनं वाढली. मात्र भिवंडी बायपास रस्ता तेवढाच राहिली, त्याचं रुंदीकरण झालंच नाही. याचा परिणाम असा झाला की अनेकदा ठाण्याहून शहापूर गाठायला एक ते दोन तास लागतात. यावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी MMRDAनं ठाणे-पडघा उन्नत मार्ग उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.