Miraroad Crime : भाजपा महिला प्रमुख सुलताना खान यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट
मीरा रोडच्या भाजपा महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन व्यक्तींनी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात सुलताना यांच्या हाताला गंभीर दुखापत झालीये. या हल्यानंतर त्यांना तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आलंय. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.