Lata Eknath Shinde Thane Lok Sabha : श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे: आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. निवडणुकीची अग्नीपरीक्षा आमच्यासाठी नवीन नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे अगोदरच निवडून आले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ठाण्यात लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election Voting) मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवावीत. सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा, दुसऱ्यांनाही खाली उतरवा आणि नरेश म्हस्के यांना मतदान करा, असे लता शिंदे यांनी म्हटले. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार, असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. तो अगोदरच निवडून आलाय. त्याच्याबद्दल काय सांगणार? जनता त्याच्यासोबत आहे. श्रीकांत शिंदे भरघोस मतांनी निवडून येत कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास लता शिंदे यांनी व्यक्त केला.