Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आणि आतापर्यंत त्यांनी केलेले विरोध आणि वाद
कळवा-मुंब्रा पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.. आणि हा खोटा गुन्हा असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असं विधान केलं... या घटनेचे आता चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाडांची भेट घेत समजूत काढण्याचे प्रयत्न केले आहेत... तर दुसरीकडे आव्हाड समर्थक कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय.. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलंय.