Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेपार्ह पोस्ट, आरोपी अनंत करमुसे यांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात १०० ते १५० पानांचं दोषारोपपत्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळं आरोपी अनंत करमुसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करमुसे यांनी आमदार आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकला होता. या प्रकरणानंतर हेमंत सुधाकर वाणी यांनी ५ एप्रिल २०२० रोजी अनंत करमुसे यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार आव्हाड यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola