
Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE
बातमी जनता दरबारावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धा संदर्भातील...एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे..थोड्याच वेळात महाजन वाडी सभागृहात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडणार आहे... पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापुर्वी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी या जनता दरबारचे आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलंय.. यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलं.,.. दरम्यान ठाण्यात होणाऱ्या भाजपच्या जनता दरबाराचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेला ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
गणेश नाईक काय म्हणाले?
पक्षाने माझ्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकांची कामे करणे आणि पक्ष वाढविणे माझे काम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्यास चांगलेच… वेगळे लढल्यास भाजपा पुर्ण ताकदीने उतरेल.. आमची तयारी आहे
पक्षाने आदेश दिल्यास ठाणे जिल्ह्यातील महानगर पालिकेवर एकहाती सत्ता आणणार
जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न समजून घेत संबंधीत शासकीय विभागांना आदेश देणार