Dombivli MIDC Blast : सूचनांची अंमलबजावणी न केल्याने पुन्हा विस्फोट - राजू नलावडे
Dombivli Blast : डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या स्फोटानंतर 2016 सालच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाने हीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर त्या दुर्घटनेतील मृतांना जखमींना आणि नुकसान झालेल्यांना काय भरपाई मिळाली, त्यावेळीच्या चौकशीचे काय झाले, अहवालात काय सांगण्यात आलंय हे सर्व 'एबीपी माझा'ने शोधून काढलं आहे.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या औद्योगिक स्फोटानंतर 2016 च्या आठवणी जाग्या झाल्या नसतील तर नवलच. कारण 2016 मध्ये देखील अशाच प्रकारचा स्फोट झाल्याने बारा जणांना आपला जीव गमववा लागला होता, 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. ज्यामध्ये अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यानंतर एक चौकशी समिती गठण करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नाही. मात्र तो अहवाल 'एबीपी माझा'च्या मिळवला आहे. जर या अहवालात नमूद केलेल्या गोष्टी तेव्हापासून अंमलात आणल्या असत्या तर आज हा स्फोट झाला नसता.