Dombivli Blast CCTV : डोंबिवली MIDCमध्ये ब्लास्ट, परिसरातील दुकानं हादरली तो क्षण ABP Majha

Continues below advertisement

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने या ठिकाणच्या कंपन्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला आता पाताळगंगा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. पाताळगंगा एमआयडीसी आणि निवासी परिसरामध्ये कोणताही बफर झोन शिल्लक राहिला नसून या ठिकाणी जर कंपन्या स्थलांतरित केल्या तर आंदोलन उभा करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. 

डोबिंवलीमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 8 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचसोबत या परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले. येथील एमआयडीसीला लागून नागरी वस्ती उभी राहिल्याने अखेर केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये स्थालांतरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

डोबिवली मध्ये केमिकल ब्लास्ट झाल्याने या भागातील केमिकल कंपन्या इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी पाताळगंगा एमआयडीसी भागात या कंपन्या स्थालांतरीत करण्यात येणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी मध्ये कंपन्या आणि नागरी वस्ती यामध्ये बफर झोन शिल्लक नसल्याने झालेल्या ब्लास्टमध्ये अनेक लोकांचे प्राण केले, तर हजारो घरांचे नुकसान झाले. 

पाताळगंगामध्येही डोंबिवलीसारखीच अवस्था

बफर झोन असलेल्या भागात केमिकल कंपन्या स्थलांतरित व्हाव्यात हा सरकारचा हेतू असला तरी ज्या पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या नेण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा एमआयडीसीची जागा आणि येथील गावं एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे पाताळगंगा भागात केमिकल कंपन्या स्थालांतरीत करण्यास येथील गावकरी, संघर्ष समिती आणि राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. 

सरकारने गावकऱ्यांनी विश्वासात न घेता केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये आणल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापचे सरपंच सुनिल सोनावळे आणि भाजपाचे पदाधिकारी  विजय मुरकुटे यांनी दिला आहे. तर बेमुदत उपोषण करून सरकारला धारेवर धरणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मारूती पाटील यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram