Dombivli MIDC Blast : कामावर कशाला पाठवलं? चौकशीसाठी आलेल्या कुटुंबियांना मालकाची उर्मट उत्तरं
डोंबिवलीमधील अनुदान कंपनीत झालेल्या स्फोटात अद्याप काहींचे अजुनही मृतदेह सापडले नाहीयेत. राकेश राजपूत हे अमुदान कंपनीच्या बाजूला असलेल्या कंपनीत काम करत होते, मात्र स्फोट झाल्यानंतर त्यांना बाहेर पडता आले नाही, त्याच्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी मृतदेह आढळलेला नाही, त्यामुळे त्यांचं कुटुंब तीन दिवसांपासून रुग्णालयं, पोलीस स्टेशन आणि घटनास्थळी शोध घेतायत. तसंच चौकशी करम्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना कामावर पाठवलं कशाला असा उद्धटपणे सवाल मालकाने विचालाय.,
डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मालती मेहता गंभीर आजारी आहेत शिवाय त्यांचं वय जास्त असल्यानं त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. दरम्यान मालती मेहता यांची केवळ चौकशी करण्यात आलीय. त्यामुळे पोलिसांनी आज केवळ मलय मेहताला न्यायालयासमोर हजर केलं असून त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.