Dombivali Milk Adulteration : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! दुधात भेसळ करणाऱ्यांचा भांडा फोड
डोंबिवलीमधल्या टेम्पो नाका परिसरात एका इमारतीमध्ये बंद दाराआड दुधात भेसळ होत असल्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुधात भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे एका नामांकीत दुध कंपनीच्या पिशव्यांमध्ये हे भेसळ करत होते. दुधात भेसळ केल्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून पिशव्यांचं सीलही बंद करुन टाकायचे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी आरोपी रमेश वणपतीला पोलिसांनी अटक केलीये.