Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO

Continues below advertisement

Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: आज 5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026 ) उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत आहे. या महोत्सवात तब्बल 71 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. गोविंदा पथकांचा मोठा सहभाग आणि ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO

गिरगावमधील ओमकार गोविंदा पथकाने ठाण्यातील मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये कडक 9 थर रचले. मात्र यानंतर लगेच संपूर्ण थर कोसळले. यादरम्यान पथकातील टॉपचे 4 थर हवेत होते. यावेळीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola