CM Eknath Shinde on Malanggad : मलंगगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री
मलंगगड मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मलंगगड इथे अखंड हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल हजेरी लावली. स्थानिकांची मलंगगड मुक्तीच्या भावनांची मला कल्पना आहे, ती मागणी पूर्ण करणारच असं मुख्यमंत्री काल म्हणाले. काही गोष्टी अशा जाहीरपणे बोलता येत नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लीम समाजांत गेल्या अनेक वर्षांपासून वाद चालू आहे. दोन्ही धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे. या आंदोलनाचा उल्लेख करत शिंदे यांनी उपस्थितांना मलंगगड मुक्तीचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईचं उदाहरण दिलं..