CM Eknath Shinde यांचे मिशन Thane , ठाण्यातील पायाभूत सुविधांवर भर : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाण्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला आहे. ठाण्यासह परिसरातील वाहतूककोंडीवर उतारा मिळविण्यासाठी एमएमआरडीएकडून १७ हजार कोटी रुपयांचे तब्बल २१ प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. ठाणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात वर्षातील १२ महिने वाहतूककोंडी होते. गाडीचालक तसेच, प्रवाशांना काही किलोमीटर अंतरासाठी कोंडीत तासनतास अडकून राहावे लागते. ठाणेकरांची यातून सुटका होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील प्रकल्पांवर भर दिला आहे.