Bhiwandi Pirani Pada Fire : भिवंडीतील पिरानी पाडा परिसरात मध्यरात्री भीषण आग

Continues below advertisement

Bhiwandi Pirani Pada Fire : भिवंडीतील पिरानी पाडा परिसरात मध्यरात्री भीषण आग

भिवंडी शहरातील पिरानी पाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गुलशन वखारीच्या समोर फळांच्या कॅरेटला अचानक भिषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले व शेजारच्या तीन मंजिल इमारतीला देखील आग पसरू लागल्यामुळे इमारतीतील रहिवाशी घाबरले होते. स्थानिकांच्या मदतीने अग्नीशमन दलाने रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढले असुन या दरम्यान एक पोलीस कर्मचारी खड्ड्यात पडल्याने जखमी झाला आहे तसेच या आगी वर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तब्बल एका तासानंतर या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola