Avinash Jadhav : मुंब्रातील मशिदींवर कारवाई झाली नाही तर? अविनाश जाधव म्हणतात...
मनसे विरोधात काल रात्री अचानक हजारोंचा जमाव मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर जमा झाला. मनसेच्या स्थानिक नेत्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. रमझानच्या काळात मनसेचे स्थानिक नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवलं तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी मुंब्रा प्रवेशबंदी लागू केली.