Anand Dighe Jayanti : आनंद दिघे जयंतीनिमित्ताने शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन : ABP Majha
Continues below advertisement
आनंद दिघे यांची आज जयंती... त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रम आणि शक्तिस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक असे नेते देखील येणार असल्याची माहितीय. काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी आनंद आश्रमात जाणं टाळलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणारेय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला ठाकरे गट विरोध करणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
Continues below advertisement