Ambernath : अंबरनाथमधल्या रोटरी शाळेच्या एका खाजगी मिनी स्कूल बसला अपघात

 अंबरनाथमधल्या रोटरी शाळेची एक खाजगी मिनी स्कूल आज सकाळी रिव्हर्स घेण्याच्या प्रयत्नात उलटल्यामुळं उपघात घडला. स्थानिक रहिवाशांनी तातडीनं बसवर चढून सगळ्या विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढलं. तरीही या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. आज सकाळी पावणेसातच्या सुमारास ग्रीन सिटी संकुलातल्या रिव्हरवूड रिव्हरवूड इमारतीसमोरील उतारावर हा अपघात घडला. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, रोटरी शाळा व्यवस्थापनानं ही बस शाळेची नसून, काही पालक त्यांच्या सोयीनुसार या बसनं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola