Ambarnath Rain: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली; वाहतुकीवर परिणाम
Ambarnath Rain: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली; वाहतुकीवर परिणाम अंबरनाथ शहरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं कल्याण कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली गेला. विमको नाका, डीएमसी कंपनी, मोरीवली या परिसरात पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं. त्यामुळं काही काळासाठी राज्य महामार्गावरील वाहतूक मंदावली, त्यामुळं या साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागत असून शाळकरी मुलांना देखील याचा नाह त्रास सहन करावा लागत आहे.