Akshay Shinde Funeral Badlapur : अक्षय शिंदेच्या आई, वडिलांनी मृतदेह ताब्यात घेतला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय शिंदेवर काहीच वेळात अंत्यसंस्कार होणारेत. काहीच वेळापूर्वी कळवा रुग्णालयातून अक्षयचा मृतदेह घेवून त्याचं कुटुंब स्मशानभूमीकडे निघालंय. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी पार पडेल. पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणला आहे. दुसरीकडे या स्मशानभूमीत अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होऊन सात दिवस झालेत. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही. उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांनी सगळी तयारी केली. मात्र त्याला स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि जनतेनं विरोध सुरू केलाय. शांतीनगर स्मशानभूमीत स्थानिक मोठ्या प्रमाणावर एकवटले आहेत.
दरम्यान अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला उल्हानगरमधील स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय..तसंच स्थानिकांनी पोलिसांनी खणलेला खड्डा देखील बुजवला