Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा दावा आव्हाडांनी केलाय.. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केलीये..मात्र आम्ही या ऑडिओ क्लीपची पृष्टी करत नाही
अक्षय शिंदेवर आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. काहीच वेळात अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात हालचाली वाढल्यात.. कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणला जाईल. पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणला आहे. दुसरीकडे या स्मशानभूमीत अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात तणाव वाढलाय.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होऊन सात दिवस झालेत. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही. उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांनी सगळी तयारी केली. मात्र त्याला स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि जनतेनं विरोध सुरू केलाय. शांतीनगर स्मशानभूमीत स्थानिक मोठ्या प्रमाणावर एकवटले आहेत.