Thane FIR Against Jitendra Awhad : महेश आहेर मारहाण प्रकरणी आव्हाडांसह आणखी 6 जणांवर गुन्हा दाखल

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर  यांच्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नौपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय... जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याची माहिती मिळतेय.. महेश आहेर हे काल सायंकाळी घरी जात होते. त्यावेळी पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले  आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय..दरम्यान आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी यासंदर्भात वर्तक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola