Shivsena Symbol : केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गट दिल्ली हायकोर्टात
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे गटानं आता दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. चिन्हं गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटानं याचिकेत केलीय. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटानं याचिकेत केलाय.