Raj Uddhav Thackeray : 'विजय मेळाव्या'साठी ठाकरे बंधू एकत्र, १९ वर्षांनी इतिहास घडणार!

Continues below advertisement
पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता मुंबईतील NSCI Dome, Worli येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल एकोणीस वर्षांनंतर एकाच मंचावर येणार आहेत. 'विजय मेळावा' या कार्यक्रमाचे निमित्त आहे. राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या संदर्भातले दोन्ही GR मागे घेतले. ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने हे GR मागे घेतल्याचा दावा करत ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि मनसेने पाच जुलैला 'विजय मेळाव्या'चे आयोजन केले आहे. दरम्यान, मराठी जनांनी सरकारला नमवले, आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत अशा आशयाचे पत्रक दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आमंत्रित म्हणून या पत्रकावर नाव छापण्यात आले आहे. संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. ते तुम्ही मराठी जनांनी आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करतो." त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे असे आवाहन करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी "टायगर अभी जिंदा है" असे म्हणत भाजपला डिवचले आहे. फडणवीस, मोदी आणि शहांनादेखील मेळाव्याचे निमंत्रण देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ही अराजकीय निमंत्रण पत्रिका असून मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola