WEB EXCLUSIVE | पंढरपुरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून ओनियन बोअरिंग मशीनची निर्मिती
Continues below advertisement
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 मार्च 2020 दरम्यान संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर "डीपेक्स -2020" या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र आणि गोव्यातील जवळपास 265 प्रकल्प सादर करण्यात आले होते. पंढरपुरातील SVERI महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट यंत्र तयार केलं आहे. शेतकऱ्यांचे श्रम वाचवणाऱ्या या यंत्रास कोणत्याही पद्धतीचे वीज किंवा बॅटरीची आवश्यकता नाहीये.
Continues below advertisement