PUBGची नव्या अवतारात भारतात एंट्री, 2051 सालचा सेटअप
पबजीचा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळणार आहे. पबजीने नव्या अवतारात भारतात एंट्री मारलीय. पबजी न्यू स्टेट लॉन्च झाला असून तासाभरात ५ लाखांहून अधिक जणांना हा गेम डाऊनलोड केलाय. क्राफ्टॉन या कंपनीने हा गेम विकसित केला असून अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलमध्ये हा गेम मोफत खेळता येणार आहे. पबजीचा नवा गेम तुमच्या मोबाईलमध्ये १.४ जीबी स्पेस असणे आवश्यक आहे. तसंच तुमचा फोन अँड्रॉईड ६.० मार्शमॅलो किंवा त्यावरील ओएस वर्जनवरील असणं गरजेचं आहे. या नव्या गेमचं वैशिष्ट्य म्हणजे यांत २०५१ सालचा सेटअप आहे. नवा अवतार भविष्यातील २०५१मधल्या परिस्थिती आधारित आहे.. यांत नवी शस्त्र, गाड्या आणि उच्च दर्जाच्या ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय