5G Network : PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार 5G ची सुरुवात, काय असतील वेगवान नेटवर्कचे फायदे?

Continues below advertisement

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करत आहे. एक ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून भारतात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहे. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram