Microsoft Windows 11 : मायक्रोसॉफ्टकडून विंडोज 11 लॉन्च, युजर्ससाठी अनेक नव्या फिचर्सची पर्वणी

Continues below advertisement

तब्बल सहा वर्षांनी मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोजमध्ये अपडेट्स करत Windows 11 च्या रुपात नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. या विंडोजमध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. फ्रेश लूक, नवीन थीम, वेगळं स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट सेंटर आणि बऱ्याच नवीन सुविधा या  Microsoft Windows 11 मध्ये देण्यात आल्या आहेत. 

या आधी मायक्रोसॉफ्टमध्ये डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता Windows 11 मध्ये मध्यभागी असणार आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स या नव्या विंडोजमध्ये जोडण्यात आल्याने व्हिडीओ कॉल्स आणि मेसेज करणे अधिक सोपं होणार आहे. तसेच विंडोज अपडेटची साईजही कमी करण्यात आली असल्याने डाऊनलोड करणं अधिक सुलभ होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram