Audi Q 5 : ऑडीची 'क्यू 5' गाडीचं मुंबईत अनावरण, जाणून घ्या 5 फिचर्स
आलिशान आणि दमदार गाड्यांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणा-या 'ऑडी' या ब्रँडनं 'क्यू 5' ही नवी एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत आणली आहे. मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात या गाडीचं अनावरण करण्यात आलं. बॉलिवूडचा स्टार अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची या सोहळ्याला खास उपस्थिती होती. आरामदायक प्रवासासाठी प्रसिद्ध अशी 'क्वाट्रो' प्रणालीसह 249 बीएचपीचं शक्तीशाली इंजिन, थ्री झोन एसी, 8 एअरबैग्ज, आणि उत्तम मनोरंजनासाठी 19 स्पीकर्स या गाडीत बसलेल्या व्यक्तीला एक सुखद अनुभव देतात. पेट्रोल आणि डीझेल या दोन्ही मॉडेलमध्ये ही गाडी उपलब्ध असून याची एक्स शोरूम किंमत 58 लाखांच्या पुढे सुरू होते.