Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement

Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट 

नाशिकमधील टीसीएस (TCS Case) कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या नऊ गुन्ह्यांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, फरार असलेली महिला आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तिला छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले आहे. आता निदा खान अटकेनंतर  सामाजिक न्याय मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.  

संजय शिरसाट म्हणाले की, काल संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी नाशिक धर्मांतरप्रकरणी निदा खान या मुख्य आरोपीला अटक केली.  मार्चमध्ये ही घटना घडली होती. निदा खान दीड-दोन महिने कुठे होती हे माहीत नाही. निदा खान संभाजीनगरमध्ये अशा परिसरात लपली होती, जो झोपडपट्टी एरिया आहे. तिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. ही खान एकटी नव्हती तर तिची आई आणि मावशी तिच्या सोबत होती. तिला एमआयएमने सहकार्य केले. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भात उघडपणे वक्तव्य केले होते आणि एका अर्थाने तिला पाठिंबा दर्शविला होता. इतरही ठिकाणी एमआयएम त्यांच्या हालचाली वाढवत आहेत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान हा एक मोहरा आहे. त्यांचे महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे. पुणे, संभाजीनगरसह सगळीकडे असे प्रकार पाहायला मिळतील. हिंदुंचा द्वेष करण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola