Marathi Language Controversy: सुशील केडियाचे राज ठाकरेंना आव्हान, 'मी मराठी शिकणार नाही!'
Continues below advertisement
राज्यामध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तयारी सुरू असतानाच, गुंतवणूकतज्ज्ञ सुशील केडिया यांनी या वादात भर घातली आहे. सुशील केडिया यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टॅग केले आहे. या पोस्टमध्ये केडिया यांनी म्हटले आहे की, "मी मराठी शिकणार नाही काय करायचंय ते करा." त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही काय करायचंय बोला." सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, "राज ठाकरें नीट ऐका. मुंबईत तीस वर्षं राहूनही मला मराठी व्यवस्थित येत नाही. तुमच्यासारख्या हरेरावी करणाऱ्या माणसाला मराठीचा मक्ता जोपर्यंत दिला गेलाय, तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की मी मराठी शिकणार नाही. काय करायचंय ते करा." या चिथावणीखोर पोस्टमुळे सध्या सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि या मुद्द्यावरून मोठा वाद समोर येत आहे.
Continues below advertisement