राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांचा बहिष्कार, खासदार सुप्रिया सुळेंकडून केंद्र सरकारचा निषेध
येत्या एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे. असाच अर्थसंकल्प प्रत्येक राज्यातील विधानसभेमध्येही सादर करण्यात येतो. अर्थसंकल्प म्हणजे येत्या वर्षभरातील जमा व खर्चाचा ढोबळमानाने मांडलेला अंदाज होय. चालू वर्षाचं अपेक्षित उत्पन्न आणि खर्च याचा लेखाजोगा अर्थसंकल्पात मांडण्यात येतो. या आधारे सरकारला पुढच्या वर्षभरात कशा पद्धतीने आर्थिक नियोजन करायचं त्याची दिशा मिळते. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येऊन त्याला संसदेची मंजुरी घेतली जाते.